Ad will apear here
Next
‘राष्ट्रवादी’तर्फे लोकसभेचे आणखी पाच उमेदवार जाहीर
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभा निवडणुकीसाठी पहिली १२ उमेदवारांची यादी १४ मार्च २०१९ रोजी यादी जाहीर केल्यानंतर १५ मार्चला आणखी पाच उमेवारांची घोषणा प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

यामध्ये धनराज महाले (दिंडोरी), समीर भुजबळ (नाशिक), डॉ. अमोल कोल्हे (शिरुर), बजरंग सोनवणे (बीड), पार्थ पवार (मावळ) यांचा समावेश आहे. लोकसभेची आणखी काही उमेदवारांची यादी शिल्लक आहे. काँग्रेस पक्षासोबत जागावाटपाची चर्चा सुरू असल्यामुळे एकत्रित नावे जाहीर केली जाणार असल्याचे पाटील यांनी या वेळी सांगितले.

शरद पवार यांनी माढा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वांशी सल्लामसलत करून नाव जाहीर केले जाईल, असे सांगतानाच एक-दोन दिवसांत इतर नावांची यादीही जाहीर केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या वेळी राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अनिल देशमुख, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZQTBY
Similar Posts
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लोकसभेची पहिली यादी जाहीर मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकसभा उमेदवारांची १२ जणांची पहिली यादी आज (१४ मार्च) प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.
‘उमेदवार चाचपणीनंतरच योग्य निर्णय घेण्यात येईल’ मुंबई : ‘लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात समविचारी पक्षांशी आघाडी करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिथे शक्ती आहे तिथे काम करण्यासाठी, जागा लढवण्यासाठीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि तिथल्या उमेदवारांच्याबाबतीत चाचपणी करण्यात आली आणि त्यावर भविष्यकाळात योग्य तो निर्णय घेतला जाईल,’
‘राष्ट्रवादी’चे ४० स्टार प्रचारक जाहीर मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.
‘राष्ट्रवादी’च्या भाषिक अल्पसंख्याक विभागाचा मेळावा मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भाषिक अल्पसंख्याक विभागाचा पहिला मेळावा येथील प्रदेश कार्यालयात उत्साहात पार पडला. भाषिक अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष मुकेश गांधी यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा घेण्यात आला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language